विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षण संस्थेअंतर्गत अखिल भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा १२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा इयत्ता ३री ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
परीक्षा विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या शाळेतच घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून परीक्षा १०० गुणांची व दोन तासांची असेल. परीक्षा मराठी व इंग्रजी माध्यमातून घेण्यात येईल.
अभ्यासक्रमात भारतीय संस्कृती, इतिहास, परंपरा, महापुरुष आणि राष्ट्रीय मूल्यांवर आधारित पुस्तिकांचा समावेश आहे.
परीक्षा शुल्क: विद्यार्थ्यांसाठी परीक्षा साहित्य शुल्क ₹५० प्रति विद्यार्थी. मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी प्रवेशिका व परीक्षा साहित्य शुल्क ₹६० प्रति व्यक्ती.
विद्यार्थ्यांना ४०% पेक्षा अधिक गुण मिळाल्यास उत्तीर्ण प्रमाणपत्र देण्यात येईल. ४०% पेक्षा कमी गुण मिळाल्यास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. शाळास्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची तरतूद आहे.
मराठी माध्यमाच्या परीक्षा साहित्याची मागणी करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर होती. परीक्षा दिनांक १२ डिसेंबर आहे.
आयोजक: विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षण संस्थान. संस्कृती शिक्षण संस्थान, कुरुक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली.
संपर्क
- श्री. दिनेश भगवानराव देशपांडे — प्रांत संयोजक
ई-मेल: dbdeshpande50@gamil.com - श्री. अभय नारायणराव हत्तेकर — प्रांत सहसंयोजक
ई-मेल: hattekarabhay@gmail.com - श्री. शिवाजी किशनराव आराळकर — प्रांत सहसंयोजक
ई-मेल: shivajiaralkar@gmail.com