शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सण नसून, आचार्य हे विद्यालयाचे केंद्र आहेत याची आठवण करून देणारा दिवस आहे. विद्या भारतीच्या परंपरेत आचार्याला ज्ञानाबरोबर संस्कार देणारा ऋषितुल्य मार्गदर्शक मानले जाते.
देवगिरी प्रांतात या दिवशी विद्यार्थी गुरुवंदन करतात. सन्मान साधा असतो; अनुभवकथनाला जागा असते. काही शाळांमध्ये निवृत्त आचार्यांना निमंत्रित केले जाते.
प्रांत कार्यालय जिल्हा समन्वयकांना आवाहन करते की, नव्याने रुजू झालेल्या आचार्यांसाठी पंच आधारभूत विषयांची एक तासाची ओळख करून द्यावी.
संपर्क करा