सा विद्या या विमुक्तये संपर्क करा अखिल भारतीय संकेतस्थळ
विद्या भारतीचा दीप आणि ग्रंथ चिन्ह विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान या राष्ट्रीय संघटनेचा प्रादेशिक घटक

ज्ञानसरीता शिशुवाटिकेला मान्यवरांची भेट

५ ऑक्टोबर, २०२६ · जळगाव

विद्या भारती देवगिरी प्रांत संलग्नित ज्ञानसरीता शिशुवाटिका, भडगाव रोड, चाळीसगाव, जि. जळगाव येथे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी तडवी-भिल्ल समाजाच्या पुनरुत्थानासाठी कार्यरत असलेले पूर्व संघप्रचारक श्री. अमरजी कटोले व श्री. दीपक पाटील यांनी भेट दिली.

कल्याण आश्रमाच्या वतीने घरवापसी झालेल्या कुटुंबांतील शिशूंसाठी संस्कार वर्ग चालविणाऱ्या ताईंसाठी विद्या भारती देवगिरी प्रांतातर्फे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. संस्कार वर्ग प्रभावीपणे कसे चालवावेत, यावर चर्चा केंद्रित होती.

ज्ञानसरीता शिशुवाटिकेच्या प्रधानाचार्या सौ. आशाताई राजेंद्र पाटे, आचार्या सौ. शिनकर ताई व सौ. ठाकूर ताई यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

पश्चिम क्षेत्र सहमंत्री श्री. प्रकाश पोतदार हेही उपस्थित होते. मान्यवरांनी ज्ञानसरीता शिशुवाटिकेची पाहणी केली.

बातम्यांकडे परत